rape | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

UP Child Rape Case: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभल जिल्ह्यातील बहजोई परिसरात एका गावात अवघ्या सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 20 वर्षाच्या तरुणाने 6 महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. मुलीची आई काही दिवसांपासून माहेरी आली होती. तेव्हा ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीच्या दूरचा नातेवाईक असून तो कुटूंबाला भेटण्य़ासाठी आला होता तेव्हा हे कृत्य केले आहे. घरात मुलीला काही वेळासाठी खेळण्यासाठी ठेवलं.  काही वेळाने आईने आपल्या  तान्हा मुलीचा आवाज ऐकला. आणि आईने धाव घेताच तान्हा मुलाला नग्नावस्थेत दिसली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. आईने आरडाओरड करत स्थानिकांची मदत घेतली. आरोपीला स्थानिकांनी तात्काळ पकडण्यात आले.

आरोपीला पोलीसांनी तात्काळ पकडले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.  आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 5 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी, जो अविवाहित आणि बेरोजगार आहे, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आणि त्याची रवानगी संभल जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.