Madhya Pradesh Accident: अज्ञात ट्रॅक्टरची बाईकला धडक, अपघातात पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील जबळपूर येथे एका अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि पत्नी गंभीर झाली आहे. ऊसाने भरलेला ट्रॅक्टरची धडक बाईकला लागल्याने अपघात झाला आहे. हा अपघात बुधवारी रात्री उशिरा घडला आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेला नेताजी सुभाष चंद्र बोस मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा- मोटारबाईकला अनियंत्रित कारची धडक,एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू; लालबाग येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर पाटणा रोडवर रात्री आठ वाजता अपघात झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस ठाण्यातील एआएएस कल्याण सिंग यांनी या अपघाताची चौकशी सुरु केली आहे. एक अज्ञात ट्रक्टर ऊस घेऊन जात होता, त्यावेळी एक कुटुंबातील तीन सदस्य बाईकवरून जात होते. बाली येथील गुनसोर गावातील हनुमान मंदिराच्या परिसरात रेवा साखर कारखान्याची जवळ हा अपघात घडला.

धर्मेंद्र कुश्वाहा (वय वर्ष 35) असं अपघातात मृत झालेल्या पतीचे नाव आहे. त्याचा मुलगा रिसाव (10) याचांही अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर धर्मेंद्र यांची पत्नी रोशनी (32) अपघातात जखमी झाले आहे. रोशनीला शहापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तीला जबळपूर येथील रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आले. पोलिस अपघाताची चौकशी करत आहे.