डॉक्टर आणि नर्सचे चाळे (संग्रहित-संपादित प्रतिमा)

उज्जैन : सध्या मध्य प्रदेशच्या उज्जैन (Ujjain) येथील एका डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा डॉक्टरने चक्क ऑपरेशन थिएटर (Operation Theater) मध्ये एका नर्सला किस करताना दिसत आहे. उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरांचे नाव डॉ राजू निदारिया असे आहे. हा  व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दाखल घेतली असून, ताबडतोब राजू यांना नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान डॉ. राजू हे सुट्टीवर असून, ते परत आल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. (हेही वाचा : शाळेमध्ये शिक्षकांचे वर्गातच प्रेमचाळे, गुन्हा दाखल करण्याची मागणी)

डॉ राजू निदारिया हे उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात, सिव्हील सर्जन या पदावर कार्यरत होते. अचानक त्यांचा ऑपरेशन थिएटरमध्ये एका नर्सला किस करतानाचा व्हिडिओ समोर आला, आणि सर्वत्र खळबळ माजली. प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत, या डॉक्टरांना कामावरून काढून टाकले आहे. याबाबत जिल्हाधिकारी शशांक मिश्रा यांनी, ‘एका अधिकाऱ्याला न शोभणारे हे कृत्य’ असल्याचे सांगितले आहे. दरम्यान राजू यांच्याजागी जागी डॉ. पीएन वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत डॉ. राजू यांना नोटीस पाठवण्यात आली. मात्र गेले 2 दिवस ते सुट्टीवर आहेत, सुट्टीवरून परत आल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. जिल्ह्याच्या आयुक्तांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.