Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Ujjain News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) जिल्ह्यात शिप्रा नदीच्या पूलावरून जात असताना एका कार पूलात पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. एका पोलिस अधिकाऱ्यांने या संदर्भात माहिती दिली आहे. जिल्ह्यातील चिमणगंज पोलिस ठाण्याच्या हल्लीतील मंगलनाथ येथे ही घटना घडली. कारमध्ये एकुण चार जण प्रवास करत होते. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

माहितीनुसार, कारहही मंगलनाथ मंदिराजवळून जात असताना हा घात घडला. कार पुलमध्ये पडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली आणि बुडणाऱ्या चार प्रवाशांना वेळेवर वाचवले. स्थानिकांनी त्यांना लगेत पाण्यातून बाहेर काढत त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना जिल्ह्या रुग्णालयात पाठवले. (हेही वाचा- बिहारमध्ये कोसळलेला पूल बांधणाऱ्या कंपनीला मुंबईत मिळाले पूल बांधण्याचे कंत्राट)

चिमणगंज पोलिस स्टेशनेला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस स्टेसनचे प्रभारी आनंद तिवारी यांनी माध्यमांना माहिती दिली की, "शिप्रा नदीवर बांधलेल्या पुलावर एक कार अनियंत्रित होऊन नदीत पडली, त्यात चार जण जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले." वाहनासमोर दिसलेल्या छोट्या कुत्र्याला वाचवताना कार पाण्यात पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पाण्यातून वाहन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.