Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील गंधवानी येथे तापमान वाढीमुळे आणि उष्माघातामुळे दोन चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दोन बाळांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सीताराम यांती आठ महिन्यांची मुलगी आणि राजूची चार महिन्यांची मुलगी या दोघी उष्माघातामुळे दगावल्या. राजू यांच्या मुलीला दोन दिवसांपासून खुप ताप होता. तिला उपचारासाठी मनवर येथे नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा- कानपूरमध्ये पाणीपुरी खाण्यावरून झाला विवाद, दोन गटाकडून गोळीबार, 6 जण जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, गावातीस सरपंच ध्यानसिंग यांनी तीव्र उष्णतेची लाट आणि आकस्किम मृत्यूंची नोंद घेतली आहे आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागाला सुचना दिल्या. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी खबरदारीचे आवाहन केले आहे. दोन मुलींचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याने शहर हादरले आहे. एका मुलीला दोन दिवसांपासून ताप आला होता परंतु तापामुळे वाढत्या उष्माघातेमुळे मुलीचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितले. तर दुसरी कडे तापमान वाढत असल्याने असाह्य झाल्याने मुलीचा मृत्यू झाला असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला.
आरोग्य केंद्राकडून वारंवार सुचना येत आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्या. विशेषत: लहान मुलांकडे लक्ष द्या. मध्य प्रदेशातील गांधवानी सामुदायिक आरोग्य केंद्रासह जवळपासच्या उप-आरोग्य केंद्रांमध्ये विशेष ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) कॉर्नर स्थापित करण्यात आले आहेत. ही केंद्रे उष्माघात आणि संबंधित आजारांमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी सुसज्ज आहेत