कानपूरमध्ये पाणीपुरी खाण्यावरून असा वाद झाला की गोळ्या झाडल्या गेल्या आणि डझनहून अधिक लोक जखमी झाले. बुधवारी सायंकाळी राणीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र चौकात एका हातगाडीजवळ पाणीपुरी खाण्यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. रिपोर्टनुसार, वादानंतर काही वेळाने एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या दुकानावर हल्ला केला, ज्यामध्ये जोरदार दगडफेक झाली आणि लाठ्यांचाही वापर करण्यात आला. दरम्यान, छतावर असलेल्या घरमालकानेही आपल्या परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार सुरू केला. या वादात दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले असून, कोणीही गंभीर जखमी नसल्याचा दावा पोलिस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
पाहा पोस्ट -
Never a dull day in UP.
After the famous Baghpat "war" over "chaat", two groups in UP's Kanpur clashed following altercation while having "golgappas". One group resorted to massive stone-pelting while a person from the rival group could be seen firing from the terrace. pic.twitter.com/7py4a6RtS2
— Piyush Rai (@Benarasiyaa) May 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)