Coronavirus (Photo Credits: IANS)

Coronavirus: दिल्लीतील कॅन्सर इन्स्टिट्यूट (Delhi State Cancer Institute) मधील 2 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना (Nursing Staff) कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापूर्वी या संस्थेतील 4 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीमध्ये तबलीगी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेल्या नागरिकांमुळे देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 445 कोरोना रुग्ण आढळले असून 6 कोरोना बाधितांचा बळी गेला आहे.

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधितांची सेवा करत आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आतापर्यंत जगभरातील अनेक डॉक्टर्संना कोरोनाची लागण झाली आहे. देशात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: भारतात गेल्या 12 तासांत कोरोनाचे 302 रुग्ण; देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3374 वर पोहचली)

भारतात गेल्या 12 तासांत कोरोनाचे 302 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3374 वर पोहचली आहे. यातील 3030 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 267 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, 77 जणांची कोरोनासोबतची झुंज अपयशी ठरली आहे.