इंदौर: झेंडा कोणी फडकवायचा या वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; पहा व्हायरल व्हिडिओ
Two Congress leaders entered into a brawl (PC - ANI)

आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day 2020) उत्साहात साजरा होत आहे. मात्र, मध्यप्रदेशमध्ये या दिवसाला नाट्यमय वळण लागल्याचे पहायला मिळाले. मध्यप्रदेशमध्ये अनेक वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता आली. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त इंदौरच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, येथील झेंडा कोणी फडकवायचा यावरून 2 गटांमध्ये वादावादी झाली.

काँग्रेस नेते देवेंद्रसिंह यादव आणि चंदू कुंजीर यांच्यामध्ये हाणामारी झाली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करून ही मारामारी सोडवली. या संपूर्ण नाट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - पी. चिदंबरम यांना अटक करणारे अधिकारी रामास्वामी पार्थसारथी यांच्यासह 28 CBI अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक)

मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. मध्य प्रदेशात काँग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे कमलनाथ आणि युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. दरम्यान, नेतृत्वाचा प्रश्न राज्यात सुटू न शकल्याने अंतिम निर्णय हायकमांडवर सोपवण्यात आला होता. त्यानुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.