Photo Credit- X

Goa Boat Incidence: उत्तर गोव्यातील कळंगुट बीचवर (Calangute Beach) आज बुधवारी 25 डिसेंबर 2024 रोजी एक पर्यटक बोट(Tourist Boat Accident) इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे उलटली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत 20 जणांना वाचवण्यात आले आहे. बोटीखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू आहे. 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलिसांनी बुडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून अपघाताचा तपास सुरू आहे. (Boat Capsized Near Gateway of India: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; मुंबई पोलीस आणि भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरू, पहा व्हिडिओ)

महाराष्ट्रातील 13 जणांचे कुटुंब होते

ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. ज्यामध्ये 20 हून अधिक पर्यटकांना कळंगुट बीचवर लाइफगार्ड एजन्सी दृष्टी मरीन लाईफसेव्हर्सने वाचवले. बोट उलटली त्यावेळी यातील प्रवाशांची वये 6 ते 65 वर्षे दरम्यान होते. यामध्ये महाराष्ट्रातील खेड येथील 13 जणांच्या कुटुंबाचाही समावेश होता. या बोटीत 20 हून अधिक प्रवासी होते. किनाऱ्यापासून सुमारे 60 मीटर अंतरावर बोट उलटली आणि सर्वजण समुद्राच्या लाटांमध्ये अडकले.

लहान मुले व महिलांची सुटका

20 प्रवाशांपैकी 6 आणि 7 वर्षे वयोगटातील दोन मुले आणि 25 आणि 55 वयोगटातील दोन महिलांना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन प्रवाशांनी लाइफ जॅकेट घातले नव्हते/ त्यामुळे त्यांना वाचवण्यात अडचणी आल्या. एक 54 वर्षीय व्यक्ती समुद्रात तरंगताना आढळून आला. त्याला नंतर मृत घोषित करण्यात आले.