Boat Capsized Near Gateway of India: मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. मुंबई पोलीस आणि भारतीय नौदलाकडून प्रवाशांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. ही बोट गेटवेवरून मुंबईजवळील एलिफंटा बेटाकडे जात असताना ती बुडू लागली. लाइफ जॅकेट घातलेल्या प्रवाशांची सुटका करून त्यांना दुसऱ्या बोटीत हलवण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय नौदलाचे जवान प्रवाशांना वाचवताना दिसत आहेत.
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, पहा व्हिडिओ -
A boat ferrying passengers near Elephanta has capsized. Mumbai Police and the Indian Navy are conducting rescue operations. Further details are awaited. pic.twitter.com/TzHPpL7Fnp
— Richa Pinto (@richapintoi) December 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)