धक्कादायक! बहिणीचा संसार सुखाचा राहावा म्हणून भावाने बदलले लिंग; ट्रान्सजेंडर बनून सोडले घर
देविका (Photo Credit : Youtube)

लग्न झालेल्या बहिणीचा संसार वाचवा, तिला पारिवारिक सुख मिळावे म्हणून एका भावाने चक्क आपले लिंग बदलले आहे. हा भाऊ देवेंद्रचा देविका झाला आहे. देवेंद्रच्या बहिणीच्या नणंदेने वारंवार धमकी दिल्याने हा भाऊ चक्क ट्रान्सजेन्डर झाला आहे. शेवटी विधिक सेवा प्राधिकरणने या प्रकरणात लक्ष घातल्याने हा मामला समोर आला, व या बहिणीला आणि या भावाला न्याय मिळाला आहे. मध्यप्रदेशच्या भोपाल येथे ही घटना घडली आहे.

20 मे 2016 रोजी देवेंद्रच्या बहिणीचे लग्न झाले. त्यानंतर काही दिवसात सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिला छळायला सुरुवात केली. ही गोष्ट तिने माहेरी सांगितली. माहेरच्या लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच फरक पडला नाही. त्यानंतर जेव्हा बहिणीने याबाबत पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नणंदेने, पोलिसांकडे गेलात तर मी भावावर विनयभंगाचा आरोप करण्याची धमकी दिली. ही धमकी तिने याधीही बरेचवेळा दिली होती. (हेही वाचा: वडिलांची पेंशन मिळावी म्हणून मुलाने बदलले आपले लिंग, मुलगी बनून रेल्वेकडे सादर केली याचिका)

अखेर या धमकीला कंटाळून आणि बहिणीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून 2017 साली देवेंद्र चक्क  लिंग बदलून ट्रान्सजेन्डर बनला. आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून त्याने आपले घरही सोडले व तो ट्रान्सजेन्डर लोकांच्या टोळीत राहु लागला. अखेर विधिक सेवा प्राधिकरणाची मदत मिळाल्याने बहिणीचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर या बहिणीचे दुसरे लग्नही झाले आहे.