Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Festival Special Trains: ऑक्टोबर महिन्यात सणासुदीचा कालावधीत (Festive Season) भारतीय रेल्वे (Indian Railways) ने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे (Western Railway) ने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. दसरा आणि दिवाळीचा सण लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी 12 जोड्या म्हणजेच 24 विशेष गाड्या चालवल्या जातील. ज्या 156 फेऱ्या पूर्ण करतील, असं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे माहिती देताना सांगितलं आहे की, या 12 जोडी विशेष गाड्यांपैकी 5 जोडी रेल्वे गाड्या बांद्रा टर्मिनस येथून, दोन जोड्या इंदूर व उधना येथून धावतील. ओखा, पोरबंदर आणि गांधीधाम स्थानकांमधून प्रत्येकी रेल्वे धावेल. या सर्व रेल्वे पूर्णपणे आरक्षित असतील.

17 ते 22 ऑक्टोबर दरम्यान सुरू होईल बुकिंग -

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व विशेष गाड्यांचे विशेष भाडे असेल. या गाड्या पूर्णपणे राखीव असतील आणि त्यांचे बुकिंग 17 ते 22 ऑक्टोबर दरम्यान सुरू होईल. मात्र, प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोना संसर्ग होई नये, यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल.

(हेही वाचा - Mumbai Local Train Update: महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेकडून नामंजूर)

 

दरम्यान, भारतीय रेल्वेने सणाच्या हंगामात 196 जोड्या म्हणजेच 392 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. महोत्सवाच्या विशेष गाड्यांच्या (Festival Special Trains) नावाखाली या ट्रेन चालवण्यात येतील. सुट्टीमध्ये प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता यावा, यासाठी दुर्गापूजा, दसरा, दिवाळी व छठ पूजा या सणानिमित्त या विशेष गाड्या कोलकाता, पाटणा, वाराणसी, लखनऊ व इतर ठिकाणी धावल्या जातील. या विशेष गाड्या फक्त 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या महोत्सव काळातच धावतील.