
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे एका 65 वर्षीय महिलेने तिच्या सहा वर्षाच्या नातवाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुदामा देवी असं आरोपीचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळी सुदामा देवी मुलीला फिरायला घेऊन गेली. नंतर सुदामा ही मुलीला विहरीत ढकत असताना गावकऱ्यांनी पाहिलं. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली होती. सूनेच्या अपमानाचा बदला घ्यावा म्हणून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा- इन्स्टाग्राम रील बनवताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू, जाणून घ्या नक्की काय घडले)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुदामा देवी मुलीला घेऊन फिरायला गेली होती. थोड्यावेळानंतर गावकऱ्यांनी सुदमाला आणि नातवाला विहिरीजवळ पाहिले. सुदामा मुलीला विहिरीत ढकलत होती त्यावेळी गावकऱ्यांनी पाहिली. आरडाओरज करत विहिरीजवळ आले आणि या घटनेची माहिती पोलिसंना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी आले आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी विहिरीत पडलेल्या मुलीला बाहेर काढले. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी मुलीला तपासले तो पर्यंत वेळ निघून गेली होती. मुलीने प्राण सोडले आणि डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. मृत मुलीच्या वडिलांनी सुदामाविरुध्दात गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार पोलिसांनी सुदामा देवीला अटक केली. सुदामा देवीची चौकशी केल्यानंतर घटनेची कबुली दिली. माझ्या मुलाच्या बायकोने माझा अपमान केला याचाच राग आल्याने मुलीचा हत्या केली असं तीने पोलिसांना चौकशीत सांगितले. या घटनेमुळे सुलतानपूर गावात एकच खळबळ उडाली आहे.