Dulal Sarkar Shot Dead (फोटो सौजन्य - X/@SudhanidhiB)

Dulal Sarkar Shot Dead in West Bengal: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तृणमूल काँग्रेसचे (TMC) नगरसेवक दुलाल सरकार यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मालदा येथील तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक, सरकार यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी झालझालिया मोर भागात डोक्यात गोळ्या झाडल्या. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली, त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून पोलिसा आरोपींचा शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बबला नावाने प्रसिद्ध असलेले दुलाल सरकार हे मालदामधील टीएमसीचे लोकप्रिय नगरसेवक होते. गुरुवारी पहाटे ढाललिया मोड परिसरात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून अनेक गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. सरकार यांच्यावर हल्ला का करण्यात आला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा -Richest and Poorest Chief Minister In India: तब्बल 931 कोटींच्या मालमत्तेसह Chandrababu Naidu ठरले देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, तर Mamata Banerjee सर्वात गरीब- Reports)

दुलाल सरकारच्या हत्येचा व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद - 

ममता बॅनर्जींनी व्यक्त केला शोक -

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुलाल सरकार यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझे जवळचे सहकारी आणि अतिशय लोकप्रिय नेते बाबला सरकार यांची आज हत्या करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या सुरुवातीपासून, त्यांनी आणि त्यांची पत्नी चैताली सरकार यांनी पक्षासाठी कठोर परिश्रम केले. बाबला नगरसेवक म्हणून निवडूनही आले. या घटनेने मला धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे, असही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांची एक्सवरील पोस्ट - 

शोकाकुल कुटुंबाप्रती शोक कसा व्यक्त करावा हेच समजत नाही. देव चैतालीला (सरकारशिवाय) जगण्याची आणि लढण्याची शक्ती देवो, अशी कामना देखील ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.