Jharkhand Building Collapse: PC TW

Jharkhand Building Collapse: झारखंड (Jharkhand) राज्यात देवगड जिल्ह्यात रविवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. या घटनेतून आता पर्यंत दोन जणांना वाचवण्यात आला आहे. अनेक जणा ढिगाऱ्याखाली अकडल्याची भीती व्यक्त करत आहे. देवगडचे जिल्ह्याअधिकारी विशाल सागर यांनी सांगितले की, रविवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळली. घटनास्थळावरून दोन जणांना वाचवण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वैद्यकिय पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्याधिकाऱ्याने घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. माहिती मिळताच, काही वेळातच, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी पोहचले आणि बचावकार्य सुरु झाले. (हेही वाचा- मुसळधार पावसामुळे उत्तराखंड रामनगर येथे पूल कोसळला (Watch Video)

पाहा व्हिडिओ 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बांधकाम सुरु होते त्याच ठिकाणी इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले आहे. लोकांना वाचवण्याचे काम सुरु आहे अशी माहिती मिळाली आहे. घटनास्थळी डॉक्टर आणि पोलिस दल आहे. पुढील तपसीलांची प्रतिक्षा आहे.

दरम्यान रविवारी पहाटे गुरुजात येथील सुरत शहरात इमारत कोसळली. या दुर्घटनेत सात जण दगावले आहे. शनिवारी देखील सचिन परिसरात इमारत कोसळली. गुजरातमध्ये या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.