Phone Snatching in Delhi: दिल्लीतील परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एक धक्कादायक घटना घडली. भरधाव बसमध्ये बड्या चालाकीने गर्दीचा फायदा घेत चोरट्याने तरुणीचा मोबाईल चोरी केला. ही घटना दिल्लीतील बसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना दिल्लीतील NCT च्या नैऋत्य भागातील असलेल्या कपशेरा भागातील बस क्र. 801 मध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दिल्लीतील दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिक एकीकडे संताप व्यक्त करत आहे. (हेही वाचा- खासगी बसची झोपड्यांना धडक, निद्रावस्थेत चार मजूर जागीच दगावले, गोव्यातील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी दिल्लीतील परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चोरीची घटना घडली. दिल्लीतील पत्रकार लवली बक्षी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिला सीटवर बसलेली असताना मागच्या सीड्यांवर चोरटा बसमध्ये शिरतो. आजूबाजूला बघतो आणि महिलेच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतो. क्षणातच त्याने बसमधून उडी मारत घटनास्थळावरून फरार होतो.
देखिए DTC बस में बेठे यात्री का फ़ोन छीनकर भागा था फ़ोन स्नैचर जो CCTV मे हुआ था कैद
घटना कपड़सेड़ा इलाके की बस रूट नम्बर 801 की है, @dcp_southwest की टीम ने आरोपी पकड़ लिया है pic.twitter.com/9hl1ftsLIQ
— Lavely Bakshi (@lavelybakshi) May 26, 2024
मोबाईल चोरीच्या घटनेनंतर महिला चोराचा पाठलाग करण्यासाठी बसमधून उतरते. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केले. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.