Lab Technician Steal Plasma: जयपूर (Jaipur) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील जेके लॉन हॉस्पिटलमधून प्लाझ्माच्या 70 युनिट्सची चोरी (Plasma Steal) झाली आहे. प्लाझ्मा चोरीची घटना उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने याप्रकरणी एमएमएस पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय रक्तपेढीचे प्रभारी डॉ. सतेंद्र सिंह यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाई मानसिंग मेडिकल कॉलेजशी संलग्न जेके लॉन हॉस्पिटलच्या रक्तपेढीतून प्लाझ्माचे 70 युनिट्स चोरीला गेले. शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. प्लाझ्मा चोरीची घटना उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासन स्तरावरच या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात रक्तपेढीचे लॅब टेक्निशियन किशन सहाय यांच्यावर प्लाझ्मा चोरीचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. (हेही वाचा -Plasma Therapy: प्लाझ्मा थेरेपी बंद करण्याचा विचार सुरू, कोरोना विषाणू उपचारांमध्ये ठरली नाही प्रभावी- ICMR)
तथापी, रुग्णालय प्रशासनाकडून प्लाझ्मा टेंडर करून लसीकरण युनिटला विकला जातो. फ्रॅक्शनेशन युनिट प्लाझ्मामधून प्रथिने काढते. SSS मेडिकल कॉलेजमधून दरवर्षी सुमारे 4 कोटी रुपयांचा प्लाझ्मा विकला जातो. एका लिटर प्लाझमाची किंमत सुमारे 3900 रुपये आहे. प्लाझ्मा चोरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही बाब वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आली. (हेही वाचा - कोविड-19 ची लस घेतल्यानंतर प्लाझ्मा दान करता येईल? Plasma Donation पूर्वी जाणून घ्या 'या' महत्त्वपूर्ण बाबी)
आरोपी लॅब टेक्निशियन निलंबित -
याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोग्य विभागाच्या एसीएसच्या निर्देशानुसार अंतर्गत तपासासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. सुशील परमार, डॉ.केसरी सिंह शेखावत, आर्थिक सल्लागार सुरेश जैन आणि औषध नियंत्रक अजय फाटक यांना या समितीचे सदस्य करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत रक्तपेढीचे प्रभारी डॉ. सतेंद्र सिंह यांची बदली करण्यात आली आहे. तथापी, आरोपी लॅब टेक्निशियनला निलंबित करण्यात आले आहे.