Republic Day 2024: आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा होत आहे. दिल्लीत तिन्ही सैन्याच्या परेड आणि राज्यांच्या चित्ररथाची (Tableau) मिरवणूक काढली जात आहेत. यंदा फ्रान्सचे लष्करही प्रजासत्ताक दिनी सहभागी झाले आहे, तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हेही प्रमुख पाहुणे म्हणून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. प्रथम राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी देण्यात आली, त्यानंतर लष्कराची परेड आणि राज्यांचे चित्ररथाची झलक दाखवण्यात आली. यात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने सर्वांच्या नजरा रोखल्या.
अयोध्या: विकसित भारत - समृद्ध वारसा थीम -
यावेळी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची थीम 'अयोध्या: विकसित भारत - समृद्ध वारसा' आहे. चित्ररथामध्ये भगवान रामाचे बालस्वरूप, जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची झलक, मध्यभागी साधू आणि रॅपिड रेल्वेचे मॉडेल, तसेच मागील भागात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची झलक पाहता येईल. यूपीची झांकी कर्तव्य पथावर येताच रामललाने सर्वांचे मन मोहून टाकले. (हेही वाचा - Republic Day 2024 LIVE: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथवर भव्य परेड सुरु, प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची उपस्थिती
पहा व्हिडिओ -
#WATCH कर्तव्य पथ पर गणतंत्र दिवस समारोह में राम मंदिर की थीम पर तैयार की गई उत्तर प्रदेश की झांकी ने हिस्सा लिया।#RepublicDay2024 pic.twitter.com/9tNTi9GYeO
— ANI_HindiNews (@AHindinews) January 26, 2024
दरम्यान, यावेळी इस्रोच्या चांद्रयान-3 आणि नारी शक्ती चित्ररथाने सर्वांनी भरभरून कौतुक केले. परेडच्या सुरुवातीला 105 हेलिकॉप्टर युनिटच्या चार Mi-17 IV हेलिकॉप्टरने ड्युटी मार्गावर उपस्थित प्रेक्षकांवर पुष्पवृष्टी केली.