Stock Market | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

शुक्रवारच्या जोरदार घसरणीनंतर, सोमवारी सकाळी भारतीय शेअर बाजार (Share Market) थोड्या घसरणीसह उघडला आहे. सेन्सेक्स (Sensex) 79 अंकांनी खाली 57,028 वर आणि निफ्टी (Nifty) 29 अंकांनी 17,055 अंकांवर उघडला.  हेल्थकेअर, टेलिकॉम आणि फार्मा स्टॉक्स बाजारात खुले आहेत. सकाळच्या वेळी, हिरव्या चिन्हात व्यापार करत असलेल्या SGX निफ्टी कडून मिळणाऱ्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. SGX निफ्टी 106 अंकांच्या वाढीसह 17,148 अंकांवर व्यवहार करत आहे. शुक्रवारच्या तुलनेत आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी आशियाई बाजार माफक प्रमाणात व्यवहार करत आहे. तैवानचा निर्देशांक 9 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

शांघाय 11 अंकांनी घसरला आहे, तर निक्केई 5 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. तर शुक्रवारी या बाजारांमध्येही मोठी घसरण दिसून आली. शेअर बाजारात घसरण होत असली तरी, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरमध्ये भारतीय इक्विटी मार्केटमध्ये 5319 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. तर ऑक्टोबरमध्ये एफपीआयने 12,437 कोटी रुपयांचे समभाग विकले. हेही वाचा  Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस, सरकार 'ही' विधेयक मांडणार

शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवीन प्रकार सापडल्याने जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. WHO ने या प्रकाराला Omicron असे नाव दिले आहे.  या नवीन प्रकारामुळे जगभरातील देशांच्या लॉकडाऊनच्या भीतीने भारतीय शेअर बाजारांसाठी शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे ठरला. सेन्सेक्स 1687 अंकांनी घसरून 57,107 वर तर निफ्टी 510 अंकांनी घसरून 17,026 वर होता.