Aircraft | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Plane Crash In Afghanistan: अफगाणिस्तान (Afghanistan) च्या बदख्शान प्रांतात कोसळलेले विमान भारतीय नसल्याच भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय (Indian Ministry of Civil Aviation) आणि डीजीसीए (DGCA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये भारतीय विमान कोसळल्याची (Indian Plane Crash) बातमी समोर आली होती. ताज्या अपडेटनुसार, हे भारतीय विमान नव्हते. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमान भारतीय नसून मोरक्कनचे नोंदणीकृत डीएफ 10 विमान आहे.

तथापि, नंतर एएनआयने ही बातमी अपडेट करताना सांगितले की डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमान भारतीय नसून मोरोक्कनचे नोंदणीकृत डीएफ 10 विमान आहे. (हेही वाचा -Plane Crash In Afghanistan: अफगाणिस्तान येथील बदख्शानमध्ये मोठी दुर्घटना, मोस्कोला जाणारं भारतीय विमान कोसळलं)

भारतीय नागरी उड्डयन मंत्रालयाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, 'अफगाणिस्तानमध्ये नुकतीच घडलेल्या विमान दुर्घटनेतील विमान हे भारतीय नसून ते नॉन-शेड्युल्ड (NSOP)/चार्टर विमान नाही. हे मोरोक्कन नोंदणीकृत छोटे विमान आहे.