Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अनुपपूर जिल्ह्यात एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, पतीने मुलाची डीएनए चाचणी  (DNA Test) करण्याची मागणी केल्यानंतर आणि मुलाचा पिता होण्यास नकार दिल्यानंतर महिलेने हे धक्कादायक पाऊल उचलले. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

ही घटना काही दिवसांपूर्वी जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेल्या बिजुरी भागात घडली होती, असे त्यांनी सांगितले. कोटमाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (SDOP) एसएस बघेल म्हणाले, "रविवारी मध्यरात्रीनंतर काही वेळातच, एक 26 वर्षीय महिला तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणू लागली की तिचा मुलगा प्रतिसाद देत नाही. मुलाच्या नाकातून रक्त येत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. (हेही वाचा - 'माझी बायको जीन्स-टॉप घालते', मुलाच्या कस्टडीवरून नवऱ्याचा अजब युक्तिवाद; न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल)

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. नातेवाईकांचे जबाब नोंदवल्यानंतर मुलाच्या वडिलांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांनी मुलाला मुलगा म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याचे दिसून आले. त्याला मुलाची डीएनए चाचणी करायची होती.

बघेल यांनी सांगितले की, पुरुषाचा आरोप आहे की, जेव्हा त्याची पत्नी तिच्या माहेरच्या घरी एकटी गेली तेव्हा ती गरोदर राहिली. बघेल म्हणाले की, घटनेचा तपास आणि मुलाच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टम अहवालात महिलेनेच मुलाचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. त्यांनी सांगितले की, महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.