Image For Representation (Photo Credit: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमधील (Lucknow) एका तरूणाला होणाऱ्या पत्नीसाठी शॉपिंग करणे भलतेच महागात पडले आहे. लग्नापूर्वीच भामट्या नवरीने नवरदेवाला तब्बल 6 लाखांचा चुना लावून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. यासंदर्भात आजतकने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज अग्रवाल नावाच्या तरूणाला 15 ऑगस्टला प्रिया सिंह नावाच्या एका तरूणीची रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद होऊ लागला. दरम्यान, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान 16 डिसेंबर रोजी लग्नाची तारीख ठरवण्यात आली होती. कथित स्वरुपात मनोजच्या घरातल्यांनी आणि प्रियांकाच्या मावशीने चर्चा करुन दोघांचे लग्न ठरवले. त्यानंतर प्रियांका सिंह शेवटी हैद्राबादला जात असल्याचे सांगून त्याला चुना लावून फरार झाली. मनोजने जेव्हा प्रियांकाने दिलेले आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर कार्डचा तपास केला तेव्हा ते बनावटी असल्याचे समोर आले. त्यावेळी आपल्यासोबत फ्रॉड झाल्याचे मनोजच्या लक्षात आले. दरम्यान, प्रियंकाने मनोजला सांगितले होते की, ती यूपीएससीची तयारी करीत असून लवकरच पासही होईल. तरूणीने अभ्यासाच्या नावाखाली मनोजकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. या बहाण्याने तिने मनोजकडून घर कामासाठी जमा केलेले तब्बल 6 लाख रुपये उकळले, अशी तक्रार मनोजने केली आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh: मुरादाबाद येथे कोरोना लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा दुसऱ्याचं दिवशी मृत्यू? नेमक काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

लॉकडाऊनपासून फसवणूकीच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे. फेसबूक, व्हाट्सअप यांसारख्या अॅपच्या माध्यमातून भामट्यांनी अनेकांना लुबाडले आहे. याआधीही भारतात फसवणूकीच्या बऱ्याच तक्रारीची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांनी नेहमी सावधानी बाळगावी, असे आवाहन पोलीस आणि सायबर गुन्हे शाखेकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरीही काहीजण अशाप्रकारच्या फसवणुकीला बळी पडताना दिसत आहेत.