
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये गेल्या काही दिवसांपुर्वी एका बीटेक विद्यार्थींचा मोबाईल हिसकावून घेणाऱ्या चोरट्याचा एन्काउंटर केला आहे, या चकमकीत एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे, पोलिसांनी सद्या त्याला रुग्णालयात दाखल केले आहे, आरोपीवर या पूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहे. जितेंद्र हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 9 खटले आधीच होते. काल रात्री उशीरा झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेला पोलिस आणि आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीवर दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल असून तो सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होता. बीटेक विद्यार्थिनीचा मोबाईल लुटताना चोरट्याने तिला भरधाव ऑटोरिक्षातून खेचले होते, त्यामुळे ती ऑटोमध्ये अडकली आणि नंतर तिचाही मृत्यूशी झुंज देताना दुर्दैवी अंत झाला.
मसुरी पोलिस स्टेशन हद्दीतील कॅनॉल ट्रॅकजवळ पोलिस चेकिंग करत होते. चेकिंग करत असताना समोरून दोन मोटारसायकलस्वार येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही हल्लेखोर पोलिसांना चकमा देत पळू लागले, दरम्यान पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिसांनी गोळीबार केला, तेव्हा एक आरोपी जखमी झाला. एक जण घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी या चकमकीत एक पोलिस जखमी झाला. उपचारादरम्यान दोघांचा ही मृत्यू झाला. पोलिस खात्यात शांतता पसरली आहे.