मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) मुरैना जिल्ह्यातील (Morena District) एका 16 वर्षाच्या मुलाला एक विचित्र आजार जडला आहे. तो गेल्या 18 महिन्यांपासून शौचास गेलेला नाही. विशेष म्हणजे तो दररोज 18 ते 20 चपात्या खातो. सध्या, त्याला कोणत्याही प्रकारची समस्या भेडसावत नाही. परंतु, आपला मुलगा कोणत्या मोठ्या आजाराचा बळी ठरणार तर नाही ना? अशी भीती त्याच्या कुटुंबियांना वाटत आहे. प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील मुरैनामध्ये एका गरीब कुटुंबातील मुलाला एक गंभीर आजाराने ग्रासले आहे. हा आजार संशोधनाचा भाग असल्यास सांगत डॉक्टरही याकडे दुर्लक्ष करत आहेत. मुरैना येथील रहिवासी मनोज चांदिल यांचा 16 वर्षीय मुलगा आशिष चांदिल गेल्या 18 महिन्यांपासून शौचास गेला नाही. (हेही वाचा - Train Accident In Burhanpur: इयरफोन लावून रेल्वे ट्रॅकवरून चालणं दोन मुलांना पडलं महागात; ट्रेनच्या धडकेत शरीराचे झाले 50 हून अधिक तुकडे)
या आजाराची माहिती मिळताच नातेवाईकांनी आशिषला मुरैना-भिंड ग्वाल्हेरच्या अनेक डॉक्टर्स दाखविले. या आजाराचा शोध घेण्यासाठी तपास करण्यात आला. परंतु, अद्यापपर्यंत या रोगाचा शोध लागलेला नाही. आशिष दररोज आहारात 18 ते 20 चपात्या खातो. तरीही त्याच्या पोटात आणि शरीरात कोणतीही समस्या जाणवत नाही. हा मुलगा सामान्य परिस्थितीत आपले जीवन व्यतीत करत आहे. आपला मुलगा कोणत्या मोठ्या आजाराला बळी तर पडणार नाही ना? अशी भीती आशिषच्या कुटुंबियाला वाटत आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh: विदिशा जिल्ह्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्या; गुन्हा दाखल, तपास सुरु)
या संदर्भात तपासणीशिवाय कोणतीही शक्यता व्यक्त करणे डॉक्टर योग्य मानत नाहीत. बालरोग तज्ञ या रोगाबद्दल जाणून घेण्यासाठी एक मोठी तपासणी करण्याबद्दल बोलत आहेत. सध्या डॉक्टरांनादेखील आशिषच्या आजाराविषयी कोणतीही कल्पना नाही. यावर संशोधन करणं गरजेचं असल्यासं डॉक्टरांनी म्हटलं आहे.