Riksha Driver PC twitter

Bengaluru News:  कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एका महिलेवर भरदिवसा रस्त्याच्या मध्यभागी एका ऑटो रिक्षा चालकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ड्रायव्हरने महिलेला धडक दिली आणि ड्रायव्हरने महिलेला धडक दिली या धडकेत महिला खाली पडली. दोघांमध्ये भांडण झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसले. भांडणात रिक्षा चालकाने महिलेवर हल्ला केला दरम्यान ती महिला जमिनीवर पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने राइड रद्द केल्यानंतर ड्रायव्हरने तिच्यावर हल्ला केल्याचे समोर येत आहे. शनिवारी 20 जानेवारी बेंगळूरुच्या बेलंदूर भागात ही घटना घडली. महिलेने अॅप द्वारे ऑटो बुक केला. त्यानंतर ऑटो रिक्षा राईड महिलेने रद्द केली. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर संतापलेल्या ऑटोचालकाने महिलेवर हल्ला केला. ही घटना कॅमेरात कैद झालून असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनास्थळी दोघांचे भांडण पाहून स्थानिकांनी धाव घेतला.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. आरोपी ऑटोचालकाला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मात्र, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.