(Photo/ANI)

आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी (Terrorists) जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगर (Srinagar) आणि अनंतनागमध्ये (Anantnag) अर्ध्या तासात गोळीबार (Firing) केला. अनंतनागच्या विजवेरामध्ये दहशतवाद्यांनी एएसआय मोहम्मद अश्रफ यांची गोळ्या झाडल्या.  यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचवेळी दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या इदगाह परिसरात सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संध्याकाळी 5.55 च्या सुमारास, श्रीनगरच्या नवाकडल भागात दहशतवाद्यांनी रौफ अहमद नावाच्या व्यक्तीला त्याच्या घराजवळ गोळ्या घातल्या, ज्यात तो गंभीर जखमी झाला.

त्याला येथे SMHS रुग्णालयात आणण्यात आले, जेथे त्याचा मृत्यू झाला. या भागाला वेढा घातला गेला आहे आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.