Assam Student Stabs Teacher to Death: कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकची हत्या, अल्पवयीन विद्यार्थ्याला अटक, आसाम येथील धक्कादायक प्रकार,
Stabbing | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Assam Student Stabs Teacher to Death: आसाम राज्यातील शिवसागर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी एका कोंचिग सेंटरवर शिक्षकाने ओरडल्याच्या रागातून विद्यार्थ्यांने शिक्षकाची हत्या केली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला करणारा विद्यार्थ्यी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. शिवसागर परिसरातील पोलिसांनी त्याला अटक केले आहे. (हेही वाचा-  भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तिघांना भोकसले, गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता ११ वीमध्ये शिकणारा विद्यार्थ्या शिवसागर येथील कोंचिग सेंटरमध्ये शिकण्यासाठी जायचा. हत्येच्या अदल्या दिवशी शिक्षकाने विद्यार्थ्याला शिवीगाळ केली असा दावा आरोपीच्यी मित्राने केला. वर्गात शिकवत असताना, शिक्षकावर विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला. शिक्षक रक्तबंबाळ झाले होते. या घटनेनंतर कोचिंग सेंटरमध्ये गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना घटनास्थळी हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू सापडला. पोलिसांनी जखमी शिक्षकाला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात शांतता पसरली. पोलिसांनी सांगितले की, आम्ही आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या पुढील चौकशी आणि तपासणी सुरु केली आहे. आरोपीच्या एका मित्राने सांगितले की, विद्यार्थ्याला अदल्या दिवशी शिक्षकाने शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याने शिक्षकावर चाकूने हल्ला केला.