Photo Credit- X

Subhadra Yojana: ओडिशा सरकारने सुभद्रा योजनेअंतर्गत (Subhadra Yojana) 20 लाखांहून अधिक महिलांना तिसऱ्या टप्प्यातील 5,000 रुपये 24 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले आहेत. ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान हे पैसे देण्यात आले. मुख्यमंत्री मोहन माझी यांनी या योजनेंतर्गत आतापर्यंत 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली. महिलांना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

80 लाख महिलांना लाभ झाला

सुभद्रा योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यातील तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. 80 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. डिसेंबरपर्यंत 1 कोटींहून अधिक महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सुभद्रा योजना ही ओडिशातील सर्वात मोठी लोककल्याणकारी योजना आहे. ज्याचा फायदा 1 कोटीहून अधिक माता-भगिनींना होत असल्याचे ओडिशा सरकारने म्हटले आहे.

मागील सरकारने सुरू केलेल्या मिशन शक्ती योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज देण्यात आले होते. याउलट महिलांना सुभद्रा योजनेंतर्गत थेट आर्थिक मदत दिली जात आहे. सुंदरगड जिल्ह्यात आतापर्यंत 4.59 लाख महिलांनी सुभद्रा योजनेसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 3.37 लाख महिलांना तिसऱ्या टप्प्यात पहिला हप्ता मिळाला आहे.

सुभद्रा योजनेचे पैसे आले की नाही कसे तपासाल?

अधिकृत वेबसाइट subhadra.odisha.gov.in ला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील लाभार्थी यादीवर क्लिक करा.

जिल्हा, तहसील, ग्रामपंचायत आणि प्रभाग निवडा.

तुमचे नाव यादीत असल्यास, तुम्हाला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तुमच्या बँक खात्यात पैसे दिले जातील.

सुभद्रा योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला subhadra.odisha.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. फॉर्म भरताना सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतात.