Madhya Pradesh Video: मध्य प्रदेशातील एका शाळेतून मद्यधुंद शिक्षकाने वर्गातल्या मुलांसोबत गैरवर्तन केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक मद्यधुंद शिक्षक मुलींची वेणी कापत आहे. या घटनेनंतर शिक्षकाला निलंबित केले. (हेही वाचा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट 50 शिक्षकांना देण्यात आला 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार'; महाराष्ट्रातील 'या' 2 शिक्षकांचा समावेश)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रतोटी तहसीलच्या सेलमखेडा गावात असलेल्या एका सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यींनी शाळेत अभ्यास न केल्यामुळे त्यांना शिक्षा देत आहे. मद्यधुंद शिक्षकाने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची वेणी कापली. घाबरलेल्या मुलीने शिक्षकाकडे विनंती केली परंतु त्याने एक ऐकले नाही.
रतलाम येथील शाळेतील व्हिडिओ व्हायरल
क्या यही है भाजपा का बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ का नारा।
रतलाम में एक टीचर ने कैंची से छात्रा की चोटी काट दी। वह नशे में स्कूल पहुंचा था। इस दौरान छात्रा रोते हुए खड़ी रही। स्कूल में शोर सुनकर पास ही मौजूद शख्स वहां पहुंचा और इस पर आपत्ति जताई।
टीचर ने जवाब में कहा -जो करना है कर… pic.twitter.com/DXqKU3Bmqx
— दिलीप कुमार भारतीय 🇮🇳 (@DilipKumar_MP) September 6, 2024
या घटनेचा व्हिडिओ एकाने फोनमध्ये कैद केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर पोस्टवर त्यांना कॅप्शन लिहले. त्यात असे लिहले आहे की, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी कारवाई करावी. या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला. घटनेनंतर आदिवासी कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त रंजना सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले होते.