
Stock Market Holidays in 2025: नवीन वर्षाच्या शेअर बाजाराच्या (Stock Market) सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने 2025 च्या शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. बीएसई आणि एनएसईने जारी केलेल्या 2025 च्या सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये शेअर बाजार कधी बंद होईल हे सांगण्यात आले आहे. कॅलेंडरनुसार, 2025 मध्ये एकूण 14 दिवस (शनिवार आणि रविवार वगळता) सुट्ट्या असतील. जानेवारीत सुट्टी नसून फेब्रुवारीमध्ये सुट्टी असेल.
तुम्ही गुंतवणूकदार असाल तर 2025 मध्ये शेअर बाजार कधी बंद होणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या यादीनुसार फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी एक सुट्टी असेल. त्याच वेळी, शेअर बाजार मार्च आणि ऑगस्टमध्ये प्रत्येकी दोन दिवस आणि एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी तीन दिवस बंद राहील. तुम्ही गुंतवणूक करत असाल तर ही यादी लक्षात घेऊन तुमच्या योजना करा.
2025 मध्ये शेअर बाजार कधी बंद होणार याची यादी पहा.
26 फेब्रुवारी 2025 - बुधवार - महाशिवरात्री
14 मार्च 2025 - शुक्रवार- होळी
31 मार्च 2025 - सोमवार - ईद-उल-फित्र (रमजान ईद)
10 एप्रिल 2025 - गुरुवार - महावीर जयंती
14 एप्रिल 2025 - सोमवार - डॉ.बाबा साहेब आंबेडकर जयंती
18 एप्रिल 2025 - शुक्रवार - गुड फ्रायडे
1 मे 2025 - गुरुवार - महाराष्ट्र दिन
15 ऑगस्ट 2025 - शुक्रवार - स्वातंत्र्य दिन
27 ऑगस्ट 2025 - बुधवार - गणेश चतुर्थी
2 ऑक्टोबर 2025 - गुरुवार - महात्मा गांधी जयंती
21 ऑक्टोबर 2025 - मंगळवार - दिवाळी-लक्ष्मी पूजा (मुहूर्त ट्रेडिंग)
22 ऑक्टोबर 2025 - बुधवार - दिवाळी-बलिप्रतिपदा
5 नोव्हेंबर 2025 - बुधवार - गुरु नानक जयंती
25 डिसेंबर 2025 - गुरुवार - ख्रिसमस
मुहूर्त ट्रेडिंग कधी होणार?
2025 मध्ये दिवाळी-लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. तथापि, मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळा नंतर कळवल्या जातील.
अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार उघडेल
अर्थसंकल्पाचा दिवस असूनही 1 फेब्रुवारी 2025 (शनिवार) रोजी शेअर बाजार उघडे राहतील अशी घोषणा एनसी आणि बीएसीने देखील केली आहे. या दिवशी बाजार इक्विटी ट्रेडिंगसाठी सकाळी 9 ते दुपारी 3:30 पर्यंत आणि कमोडिटी ट्रेडिंगसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुले असतील.