SSC exam 2018: आता टीसीएस घेणार एसएससीची परीक्षा ऑनलाईन
New Job | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राज्य कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच येत्या जानेवारीत भरती परिक्षा घेण्याची शक्यता आहे. आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी एका संस्थेचीही निवड केली आहे. दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या या संस्थेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही. मात्र,ही परीक्षा घेण्याची जबाबदारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ( Tata Consultancy Services )कडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

प्राप्त माहितीनुसार, ज्या परीक्षेत परीक्षार्थींची संख्या कमी असते अशा परीक्षांपासून ही नवी संस्था कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करेन. या प्रक्रियेनुसार येत्या 13 जानेवारीला हिंदी ट्रान्सलेटर, ज्यूनिअर ट्रान्सलेटर, हिंदी सीनिअर ट्रन्सलेटर आणि तसेच, प्राध्यापक पदांसाठी परीक्षा पार पडतील. त्यानंतर सिलेक्शन पोस्ट साठीही ऑनलाईन परीक्षा 16 ते 18 जानेवारीपर्यंत पार पडतील. सिलेक्शन पोस्ट परीक्षेसाटी परीक्षार्थींची संख्या कमी असते. त्यामुळे या परीक्षांमध्ये यश मिळताच संस्था इतरही परीक्षांचे आयोजन करेन. (हेही वाचा, 2019 पासून SSC विद्यार्थ्यांसाठी असेल एकच प्रश्नपत्रिका; शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

या आधी एसएससी परीक्षांची जबाबदारी ज्या संस्थेकडे होती ती संस्था गेल्या काही काळात वादात सापडली होती. 2018 या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या सीजीएल 2018च्या परीक्षेदरम्यान बराच वाद निर्माण झाला होता. प्रश्नपत्रीका फुटण्यापासून ते परीक्षेतील अनियमितता तसेच, संस्थेची प्रामाणीकता अशा अनेक कारणांमुळे संस्था वादात सापडली होती. प्रश्नपत्रीका फुटण्याचे प्रकरण तर, न्यायालयात गेले होते. परिणामी या संस्थेला हटविण्यात आले. आयोगाने टेंडर नोटीस काढून अनेक संस्थातून संशोधन करुन अखेर या संस्थेची निवड केली आहे. त्यामुळे आता हीच संस्था एसएससी परीक्षांचे आयोजन करेन.