Dhirendra Singh (Photo Credits: ANI)

बलिया गोळीबार प्रकरणातील (Ballia Firing Incident) मुख्य आरोपी धीरेंद्र सिंह (Dhirendra Singh) याला उत्तर प्रदेशच्या (UP Police) स्पेशल टाक्स फोर्सने अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो फरार होता. एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एसटीएफच्या पथकाने बलिया गोळीबार प्रकरणातील आरोपी धीरेंद्र सिंहला लखनऊमधून अटक करण्यात आली आहे. धीरेंद्र सिंह याच्यासोबत आणखी दोन आरोपींनादेखील ताब्यात घेतले आहे. एसटीएफचे पथक धीरेंद्र याला स्थानिक पोलिसांच्या हवाली करणार आहे.

याप्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. धीरेंद्र सिंह आणि त्याच्या साथीदारांना रविवारी लखनऊमधून अटक करण्यात आली आहे. एसटीएफच्या पथकाला धीरेंद्रच्या साथीदाऱ्यांजवळ शस्त्र सापडले आहेत. एका अज्ञात स्थळी तिघांची चौकशी केली जात आहे. एसटीएफच्या पथकाने घटनास्थळी वापरलेले शस्त्रांबाबत अधिक माहिती गोळा करत आहे. हे देखील वाचा- हृदयद्रावक! गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून धडापासून वेगळं केलं शीर

एएनआयचे ट्वीट-

एसटीएफचे आयजी अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरेंद्र सिंह आणि त्याच्या साथिदारांना लखनऊ येथून अटक करण्यात आली आहे. एका अज्ञात स्थळी तिघांची चौकशी केली जात आहे. तसेच या घटनेवेळी वापरलेली शस्त्राबाबत माहिती गोळा केली जात आहे. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी घडली आहे. दुर्जनपुर गावात 15 ऑक्टूबर दुप्पट नंतर पोलिस आणि जिल्हा प्रशासनातील एका व्यक्तीच्या गोळी मारून हत्या करण्यात आली होती. मृत व्यक्तीचे नाव जयप्रकाश उर्फ गामा पाल असे आहे.