होळी-दीपावलीप्रमाणेच प्रजासत्ताक दिना (Republic Day) दिवशी ही सर्व कंपन्यांकडून ग्राहकांनसाठी आकर्षित ऑफर (Offer) ठेवली जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपन्या आपली विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना मोठ्या ऑफर्स देतात. मार्केटिंगच्या जगात एअरलाइन्सही (Airlines) आजही मागे नाहीत. खाजगी विमान वाहतूक कंपनी गो फर्स्टने (Go First) अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त विमान टिकिटांची ऑफर आणली आहे. GoFirst ने प्रजासत्ताक दिनानिमित्त राईट टू फ्लाय (Right To Fly) नावाची ऑफर सुरू केली आहे. राइट टू फ्लाय ऑफर अंतर्गत ग्राहकांना अतिशय स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी मिळत आहे. गो फर्स्ट एअरलाइनच्या प्रजासत्ताक दिन ऑफर अंतर्गत, विमान टिकिट फक्त 926 रुपयांपासून सुरू होत आहे. कंपनीने या ऑफरला राइट टू फ्लाय म्हणजेच उड्डाणाचा अधिकार असे नाव दिले आहे.
Tweet
Double Treat by GO FIRST! ✈️💙
Fly between #Mumbai and #Chennai with benefits of a FREE Meal and Seat!
Hurry! Offer valid till 31st January, 2022 only!
Book now - https://t.co/oFjsMWzEIt pic.twitter.com/z1DA720wft
— GO FIRST (@GoFirstairways) January 23, 2022
दरम्यान, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 22 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान टिकिट बुक करावे लागेल. या दिवसांमध्ये, तुम्ही 11 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2022 पर्यंत फ्लाइट बुक करू शकता. या टिकिटासह प्रवास करताना तुम्ही 15 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकता. ही ऑफर एकेरी विमान प्रवासावर आहे. (हे ही वाचा Republic Day Celebration: आजपासून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला सुरुवात, फ्लायपास्टच्या वेळेत बदल; जाणून घ्या कार्यक्रमाबाबत सर्व काही)
फक्त देशांतर्गत विमान प्रवासावर सवलत
GoFirst नुसार, प्रजासत्ताक दिनाची ऑफर फक्त देशांतर्गत विमान प्रवासावर उपलब्ध असेल. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर कोणतीही सूट नाही. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटसह कुठूनही टिकिट बुक केल्यास तुम्हाला या सवलतीचा लाभ मिळेल. या ऑफर अंतर्गत ग्रुप बुकिंग करता येत नाही किंवा ते ऑफरसोबत एकत्रही करता येत नाही.
विमान प्रवासात बदल केल्यास अतिरिक्त शुल्क लागणार नाही
तुम्ही गो फर्स्ट एअरलाइनच्या प्रजासत्ताक दिन ऑफर अंतर्गत टिकिटे बुक केल्यास, तुम्ही प्रवासाच्या तीन दिवस आधी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुमची फ्लाइट टिकिटे पुन्हा शेड्यूल करू शकता. जर तुम्हाला टिकिट रद्द करायचे असेल तर तुम्हाला कॅन्सलेशन चार्ज भरावा लागेल.