कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात सोनिया गांधी यांनी गरीबांना 3 महिने मोफत धान्य (Free Food Grains) पुरवठा करा, अशी मागणी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भारतात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. परिणामी देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत.
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील स्थलांतरित मजूर तसेच हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहेत. याचं पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना गरीबांना सप्टेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्याचं वाटप करावं, अशी विनंतीही सोनिया गांधी यांनी केली आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी Vaccine उपलब्ध झाल्यास 100 टक्के COVID19 च्या संकटाचे निराकरण होईल- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी)
Congress President Sonia Gandhi writes to Prime Minister Narendra Modi urging the Government to extend the provision of free food grains for a period of three months up till September 2020. pic.twitter.com/eH7xVJMsFz
— ANI (@ANI) June 22, 2020
सोनिया गांधी यांनी यासंदर्भात पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मागील 3 महिन्यात देशात लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, या काळात लाखो गरीबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता होती. लॉकडाऊन काळात लाखो गरीब कुटुंबाना दोन वेळच्या जेवणासाठी धान्य पुरवण्यात आलं. यापुढील तीन महिनेदेखील ते त्यांना उपलब्ध करून देण्यात यावं. अंत्योदय अन्न योजने अंतर्गत गरीबांना 5 किलो प्रतिमहिना धान्य उपलब्ध करुन द्यावं. सप्टेंबर 2020 पर्यंत सरकारने गरीबांना ही मदत करावी, अशी विनंती सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.
कोरोना संकटामुळे हजारो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीबांना पुढील 3 महिने धान्य मोफत मिळालं पाहिजे. माझ्या या विनंतीवर आपण लवकरात-लवकर विचार कराल आणि यासंदर्भात घोषणा कराल, असंही सोनिया गांधींनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.