कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी Vaccine उपलब्ध झाल्यास 100 टक्के COVID19 च्या संकटाचे निराकरण होईल- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Nitin Gadkari | (Photo Credit-PTI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून संक्रमितांचा आकडा लाखांच्या घरात जाऊन पोहचला आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केली आहे. पण या लॉकडाऊन 5.0 मध्ये नियम सुद्धा शिथिल करत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नाही आहे. तरीही देशभरातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपाचार करत आहेत. याच दरम्यान आता केंद्रीय नितीन गडकरी यांनी सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. गडकरी यांनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी लसीबाबत संशोधन करण्यात येत आहे. जर कोविड19 वरील लस उपलब्ध झाल्यास या महासंकटाचे जरुर निराकरण होईल असे ही त्यांनी म्हटले आहे.

नितीन गडकरी यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी अद्याप लस उपलब्ध नाही. पण आपण कोरोनासोबत जगण्यास शिकले पाहिजे. खासकरुन मुंबई, पुणे, दिल्ली या सारख्या शहरांमध्ये कोरोनाची परिस्थिती महाभयंकर असल्याचे ही गडकरी यांनी म्हटले आहे.(Goa First COVID19 Death: गोव्यात कोरोनामुळे पहिला बळी, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती)

गेल्या 24 तासांत भारतात 14,821 रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 लाख 25 हजार 282 वर जाऊन पोहोचली आहे. त्यासोबतच काल (21 जून) दिवसभरात 445 रुग्ण दगावले असून देशात मृतांचू एकूण संख्या 13,699 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा 130611 वर पोहचला असून 6006 जणांचा बळी गेला आहे.