कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देशासमोर गंभीर आर्थिक संकटाविषयी पत्र लिहिले. त्यांनी एमएसएमई बद्दलच्या चिंतेचा पुनरुच्चार केला आणि निवारणासाठी पाच सूचना दिल्या. सोनिया गांधींनी लिहिलेले पत्रही कॉंग्रेसच्या या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. या पत्रामध्ये सोनिया गांधींनी लिहिले की लॉकडाउनच्या एका दिवसाची किंमत क्षेत्रांना 30 हजार कोटींचे नुकसान करीत आहे. बहुतेक एमएसएमईकडून प्राप्त झालेल्या बहुतेक ऑर्डर आता समाप्त झाल्या आहेत. याचा पूर्ण परिणाम त्यांच्या कामावर दिसून येईल. 11 कोटी लोकांचे रोजगार हे एमएसएमईशी संबंधित आहेत, त्यामुळे आर्थिक संकटाच्या या काळाचा या क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत एमएसएमई क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सुमारे 15 लोकं या क्षेत्राशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जुडलेले आहेत. (Coronavirus: कठीण काळात कर्मचारी, सैनकांचा DA कपातीचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य नाही: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह)
कोरोना आणि लॉकडाउनमुळे एमएसएमईला मोठा झटका बसला आहे. कोरोना कालावधीनंतर एमएसएमईंना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करणे सरकारसाठी एक मोठे आव्हान असेल. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पाच पर्यायही सुचवले आहे.
Congress President Sonia Gandhi writes to Prime Minister Narendra Modi on the grave economic crisis facing the nation. She reiterated the concerns of MSMEs (Micro, Small and Medium Enterprises) & suggested five concrete ideas for redressal: Congress. #COVID19 pic.twitter.com/XPVTHvjDOS
— ANI (@ANI) April 25, 2020
कोरोना व्हायरस महामारीमुळे भारतातील लॉकडाउनला एक महिना पूर्ण झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी 13 एप्रिलने वाढवून 3 मे केला आहे. मागील एक महिन्यात देशासमोर अर्थव्यस्थेपासून रोजगारी पर्यंतच्या समस्या वाढल्या आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्षाने मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस पार्टीने यापूर्वी ट्विटरवरून लॉकडाउनमुळे 14 कोटी लोकांनी रोजगर गमावल्याची दावा केला.