Fire in Chemical Factory: आंध्र प्रदेशमध्ये गॅस गळतीमुळे रासायनिक कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी
Fire Broke Out Chemical Factory (PC - ANI)

Fire in Chemical Factory : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एलुरु जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम (Akkireddigudem) येथे एका रासायनिक कारखान्याला (Chemical Factory) लागलेल्या भीषण आगीत (Fire) सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, एलुरुचे एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, नायट्रिक ऍसिड, मोनोमिथाइलच्या गळतीमुळे कारखान्याला आग लागली. आग लागली तेव्हा औषधनिर्मिती कारखान्याच्या युनिट 4 मध्ये अठरा जण काम करत होते. मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी चार जण बिहारमधील स्थलांतरित कामगार होते. दोन तासांत आग आटोक्यात आणण्यात आली. (हेही वाचा - CNG Price Hike Today: PNG नंतर 12 तासात CNG च्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन दर)

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.