बिहारच्या (Bihar) पूर्व चंपारण जिल्ह्यातील (East Champaran) रामगढवा पोलीस ठाण्याच्या (Ramgarhwa Police Station) हद्दीत मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. शेळीला चरायला घेऊन गेलेल्या 5 मुलींचा पाण्यात बडून (Drowned) मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्व मुलींची मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रामगढवा स्टेशन प्रभारी संतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपूर विरता गावात राहणाऱ्या 5 मुली मंगळवारी दुपारी शेळी चरायला घेऊन गेल्या होत्या. त्याठिकाणी तलावाच्या काठावर पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात एक मुलगी अंघोळ करण्यासाठी गेली होती. त्यावेळी अन्य दुसऱ्या मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. ज्यामुळे तिला वाचवण्यासाठी एकामागून एक सर्व मुली खोल पाण्यात उतरल्या. मात्र, पाचही मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा-Ahmedabad Shocker: लैंगिक संबंधादरम्यान कंडोम नसल्याने युवकाने चिकटवला प्राइवेट पार्ट, उपचारादरम्यान झाला मृत्यू
सीमा कुमारी (वय, 8) कौशल्य कुमारी (वय, 10), सुगी कुमारी (वय, 12), संगीता कुमारी (वय, 10) आणि शोभा कुमारी (वय, 12) अशी मृत मुलींची नावे आहेत. एकाच दिवशी गावातील 5 मुलींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.