Rape | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

हैदराबादमधून (Hyderabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे हैदराबादमध्ये एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार (Rape) करून तिची हत्या (Murder) केल्याचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार, ही घटना गुरुवारी सैदाबाद पोलीस स्टेशन (Saidabad Police Station) हद्दीतील सिंगारेनी कॉलनीत (Singareni Colony) घडली. वृत्तानुसार, मुलगी गुरुवारी बेपत्ता झाली त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला पण ती मुलगी सापडली नाही. सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्यानंतर कुटुंबाने स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेनंतर लोकांनी परिसरात निदर्शने केली आणि रस्ते अडवले आणि त्यानंतर पोलिसांचे पथक परिसरात तैनात करण्यात आले. आंदोलकांनी मृताच्या कुटुंबीयांना 50 लाखांची भरपाई देण्याची मागणी केली. अहवालांनुसार, मुलीची आई तिच्या शेजाऱ्यावर संशयास्पद झाली, कारण तोही त्याच दिवशी बेपत्ता झाला होता.

मृतदेह पोस्टमार्टमसाठी उस्मानिया सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. पोलिसांनी मृताच्या पालकांसोबत शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर तिचा मृतदेह आरोपीच्या घरात बेडशीटमध्ये गुंडाळलेला आढळला. निकम यांना तपासात मुलगी मृत अवस्थेच सापडली. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर लगेचच अधिकाऱ्यांनी ती अर्धनग्न असल्याचे असल्याचे आढळून आले. जनतेचा संताप अनावर झाला आणि परिसरातील लोकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. जेव्हा पोलीस पीडितेचे शरीर हलवत होते, तेव्हा आंदोलकांनी अडथळा आणला. या भागात अतिरिक्त दले तैनात करण्यात आली आणि गुन्हेगारीचे ठिकाण वेढले गेले. हेही वाचा Mumbai Rape: मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात घातला लोखंडी रॉड, पीडिताची प्रकृती चिंताजनक

जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की पीडितेच्या कुटुंबाला आवश्यक मदत दिली जाईल. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.  तसेच अधिक तपास सुरू केला आहे, असे सैदाबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुब्बी रामी रेड्डी  म्हणाले. भारतीय दंड संहिता (IPC) च्या बलात्कार आणि हत्येच्या कलमांखाली आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 च्या रिलेव्हेंट कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.