Share Market Update: शेअर बाजारात कोरोना विषाणूमुळे कहर; Sensex जवळपास 1700 अंकांनी घसरला
Bombay Stock Exchange (Photo Credits: PTI)

Share Market Update: देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेचं सोमवारी शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) सुरूवातीच्या व्यापारात 1400 अंकांपेक्षा खाली घसरून 48,112 वर आला आणि निफ्टी 450 अंकांनी खाली घसरून 14,384 वर बंद झाला. बातमी लिहिताना BSE 1700 अंकांवर घसरला.

सकाळी 9.42 वाजता सेन्सेक्स मागील सत्रच्या तुलनेत 1,128.23 अंकांनी म्हणजेचं 2.28 टक्क्यांच्या घसरणीसह, 48,463.09 वर होता. तर निफ्टी मागील सत्रच्या तुलनेत 361.35 म्हणजे 2.44 टक्क्यांनी घसरून 14,473.50 वर होता. (वाचा - Stock Market: इतिहासात पहिल्यांदाच BSE सेन्सेक्स 50,000 पार, निफ्टी 14,700 अंकाच्याही पुढे)

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या 30 शेअर्सवर आधारित संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स मागील सत्रच्या तुलनेत 634.67 अंकांच्या तोटासह 48,956.65 वर सुरू झाला आणि प्राथमिक व्यापारादरम्यान 48,112.17 वर घसरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) 50 समभागांचा संवेदनशील निर्देशांक निफ्टी मागील सत्रातील 190.20 अंकांच्या कमजोरीसह 14,644.65 वर उघडला आणि 14,652.50 वर चढून 14,384.40 अंकावर घसरला.

दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना विनाश व त्यापासून बचाव करण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांमधील नकारात्मक प्रवृत्तीमुळे देशात विक्रीचा दबाव दिसून येत आहे.