Share Bazar Closed Today? 12 नोव्हेंबर 2024 या दिवशी देव उथनी एकादशी आणि तुलसी विवाहाच्या निमित्ताने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) बंद राहणार का असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. जर तुम्ही विचार करत असाल की आज स्टॉक मार्केट सुरु राहील की नाही, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की, आज दोन्ही एक्सचेंज खुले आहेत आणि ट्रेडिंग सामान्यपणे होईल. स्टॉक मार्केटमधील आगामी सुट्ट्यांवर नजर टाकल्यास, गुरु नानक जयंतीनिमित्त बीएसई आणि एनएसई दोन्ही 15 नोव्हेंबर रोजी बंद राहतील. याशिवाय 20 नोव्हेंबर 2024 रोजीही शेअर बाजार बंद राहील. हा दिवस बुधवार असेल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार होणार नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इक्विटी विभाग, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि सिक्युरिटी लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) सेगमेंटसह या दिवशी कोणतीही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी होणार नाही.
डिसेंबरमध्ये कधी राहणार शेयर मार्केट बंद
25 डिसेंबर 2024 रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने शेअर बाजारात सुट्टी असेल, जी या वर्षातील शेवटची ट्रेडिंग सुट्टी असेल. यापूर्वी 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळीनिमित्त भारतीय शेअर बाजारही बंद झाला होता. 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:00 ते 7:10 या वेळेत एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते.