Nirmala Sitharaman On EY Staff Death : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये तणाव व्यवस्थापन हा विषय शिकवण्याबाबत वक्तव्य केले आहे. यामुळे विद्यार्थी आतून खंबीर होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अर्न्स्ट अँड यंग (Ernst and Young) नावाच्या कंपनीत काम करणाऱ्या तरुण सीएच्या मृत्यूनंतर निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केलं आहे. निर्मला सीतारामन यांनी कंपनी आणि सीएच्या मृत्यूच्या घटनेचा कोणताही संदर्भ न देता हे वक्तव्य केले आहे. निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचे वर्णन क्रूर असे केले आहे. (हेही वाचा: SC on Child Pornography: चाइल्ड पॉर्न पाहणे POCSO कायद्यानुसार गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा आदेश)
2023 मध्ये CA ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मार्चमध्ये तरूणी EY च्या पुणे कार्यालयात रुजू झाली. अॅना पेरिल असे मृत तरूणीचे नाव आहे. जुलैमध्ये तिचा मृत्यू झाला. अॅनाच्या आईने ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहून त्यांना मुलीच्या मृत्यूबाबत जबाबदार धरले. नवीन कर्मचारी म्हणून मुलीला जास्त कामाचा भार देण्यात आला होता, ज्याचा तिच्यावर शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम झाला. असे त्यांनी पत्रात म्हटले होते.
काय म्हणाले अर्थमंत्री?
एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना सीतारामन यांनी २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्याच उल्लेख केला. आमची मुलं महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिक्षणासाठी जातात आणि तिथून जागृक होऊन ते बाहेर पडतात. सीएचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीला कंपनीत कामाचा ताण सहन करता आला नाही. दबाव सहन न झाल्याने तिचा मृत्यू झाला. शैक्षणिक संस्था आणि कुटुंबांनी मुलांना तणाव व्यवस्थापन शिकवले पाहिजे. तुम्ही कोणताही अभ्यास करा, कोणतीही नोकरी करा, त्यासोबतचा ताण सहन करण्याची आंतरिक शक्ती तुमच्यात असली पाहिजे.
काँग्रेसने साधला निशाणा
वेणुगोपाल यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, अॅनाच्या घरच्यांनी तिला तणाव व्यवस्थापन कौशल्ये शिकवायला हवी होती, असे सांगून अॅना आणि तिच्या कुटुंबियांना दोष देणे हे अर्थमंत्र्यांचे अत्यंत क्रूर कर्म आहे. पीडितेला दोष देण्याचा हा प्रकार घृणास्पद आहे. अशा विधानांमुळे जो संताप आणि द्वेष वाटला तो शब्दात मांडता येणार नाही. असे त्यांनी म्हटले.