Accident Caught on Camera in Haryana: ब्रेक फेल झाल्यामुळे स्कूल बसची अनेक वाहनांना धडक, दुचाकीस्वार जखमी
Accident haryana Pc TW

Accident Caught on Camera in Haryana: हिसार येथून ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसची अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात हरियाणा येथील हिसार येथील मयार गावाजवळ घडला. या अपघात स्कूल बसने दुचाकीसह अनेक कारला धडक मारली. दुचाकी चालक अपघातात जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दिल्ली पब्लिक स्कूलची होती. सुदैवाने, अपघात बसमधील विद्यार्थ्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा-नादुरुस्त बस चालकाविना रस्त्यावर धावली, धडक दिल्याने एक जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाने सांगितले की, बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव बस अनेक वाहनांना धडकली. बसने कारला देखील धडक दिली. या धडकेत कारमधील महिला अपघातातून बचावल्या. अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अपघातानंतर रस्त्यावर जमावांनी गर्दी केली. पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तपासणी सुरु केल्याचे सांगितले आहे.

अपघातानंतर दुचाकी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. अपघातानंतर अनेकांनी बस चालकाला चांगलेच सुनावले. तो मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा अनेकांना दावा केला. यानंतर शाळेच्या मुख्यध्यापिका यांनी बसचालक मद्यधुंद नसल्याचे सांगितले.