
मागील काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रूपयावर वाढणारा दबाव अजूनही कायम आहे. आज पुन्हा डॉलरसमोर रूपयाची विक्रमी घसरण आहे. आता डॉलरपुढे रूपया अजूनच घसरला. सध्या एका डॉलरसमोर भारतीयांना 74.08 रुपये मोजावे लागणार आहेत. या घसरणीमुळे सर्वसमान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता अधिक वाढली आहे. ... म्हणून अमेरिकन डॉलरसमोर रूपयाची सतत होतेय घसरण
व्याजदर कायम
जागतिक बाजारात वाढणार्या कच्च्या तेलाच्या किंमती पाहता, सामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हं होती. आज रिझर्व्ह बॅंकेनेही जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये रेपो रेट 6.50 आणि रिव्हर्स रेपो रेट 6.25 ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरदेखील स्थिर ठेवले आहेत. गृहकर्ज आणि वाहनकर्जाचे दरही कायम ठेवल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. भविष्यात कच्च्या तेलाचे दर कायम राहिल्यास महागाई वाढण्याची शक्यता असल्याचे संकेत रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत.