Republic Day parade | Representational image | (Photo Credits: PTI)

दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातो. देशात अनेक ठिकाणी झेंडावंदनसह परेड (Parade) आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राजधानी दिल्ली (Delhi) येथील परेड आणि कार्यक्रम अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल इतके सुंदर असतात. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातून ही परेड सुरू होते आणि इंडिया गेटजवळ संपते. यंदाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड समारंभासाठी, ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सनारो प्रमुख पाहुणे आहेत.

भारताच्या सैन्य शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या परेडला प्रतिष्ठेचे स्थान आहे. जगभरातील लोक ही परेड पाहण्यासाठी राजधानी येथे जमली आहे. ज्यांना ते शक्य नाही ते 26 जानेवारीच्या सकाळी आपल्या दूरचित्रवाणीवरून याचा आनंद घेतील.

Republic Day Parade 2020 Live Streaming :

प्रजासत्ताक दिनाची परेड हा दरवर्षी मुख्य कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपतींनी राष्ट्रध्वज फडकावून केली जाते. त्यानंतर राष्ट्रगीत सुरु होते, प्रत्येक भारतीय आपल्या देशाचा अभिमान बाळगत ध्वजास अभिवादन करतो. त्यापाठोपाठ सैन्याची परेड आणि मार्च सुरु होते. तर तुम्हीही हा सोहळा लाईव्ह पाहू शकता. प्रजासत्ताक दिन परेड सोहळा दूरदर्शनवरील (Doordarshan) यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित होईल, दूरदर्शन, राष्ट्रीय टेलिव्हिजन वाहिनी साठच्या दशकाच्या सुरुवातीपासून ही परेड प्रसारित करीत आहे.

सोबतच, हा कार्यक्रम प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) इंडियाच्या युट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित होईल. (हेही वाचा: Padma Award 2020: अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिससह 7 जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर; पहा संपूर्ण यादी)

दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) शहरामधील दादरच्या शिवाजी पार्क इथेही, प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात संचलनासह प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथसंचलनात केंद्राने नाकालेला ‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग - कान्होजी आंग्रे’ हा महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळणार आहे.