G20 Summit 2022: फेब्रुवारी 2023 मध्ये जी 20 शिखर परिषदेचे प्रतिनिधी औरंगाबादला देणार भेट
PM मोदी और अमेरिकी राष्ट्रपति जो बाइडन

जी 20 शिखर परिषदेचे (G20 Summit 2022) प्रतिनिधी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा, एलोरा लेणी आणि इतर प्रमुख स्थळांना भेट देतील. अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भारत 1 डिसेंबर 2022 पासून एका वर्षासाठी प्रभावशाली G20 गटाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, संयुक्त राष्ट्र (यूके) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि युरोपियन युनियन (EU) या 19 देशांचा समावेश आहे.

पुढील वर्षी 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी सुमारे 500 प्रतिनिधी औरंगाबादला भेट देतील तसेच अजिंठा, एलोरा, दौलताबाद (देवगिरी) किल्ला या जागतिक वारसा स्थळांना भेट देतील, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (हे देखील वाचा: G20 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची विशेष भेट घेतली)

प्रतिनिधींच्या दौऱ्याच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. G20 प्रतिनिधींच्या भेटीमुळे औरंगाबादची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेल म्हणून केंद्रेकर यांनी अधिका-यांना सविस्तर तयारी करण्याचे निर्देश दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.