File image of the Reserve Bank of India | (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बॅंके ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) नुकतेच एक ट्विट केले आहे, यात नागरीकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियात (Social Media) काही व्यवसायिक बॅंका (Commercial Banks) बंद पडल्याची अफवांचा (Fake News) प्रसार केला जात आहे. यामुळे नागारिकांच्या मनात नको त्या शंका येऊ लागल्या आहेत. ही माहीती खोटी आहे तसेच व्यवसायिक बॅंकेतील खातेदारानी घाबरु नये, असे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने, असे स्पष्टीकरण दिले आहे. नुकतीच पंजाब नॅशनल बॅंकेतील (Panjab National Bank) बातमी कानावर पडल्यामुळे नागरीकांचा मनात नको त्या शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांनी केलेल्या ट्विटमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी कोणत्याही खोट्या अफवांना बळी पडू नये, असे अवाहन केले आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्यवसायिक बॅंक बंद होणार आहे, अशा चुकीच्या माहितीचा प्रसार केला जात आहे. सोशल मीडियावरील हा संदेश पाहून नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच पंजाब नॅशनलबॅंकेतील ग्राहकांची गैरसोय झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे नागरीकांचा अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास बसत आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या लोकांचे व्यवसायिक बॅंकेत खाते आहे, असे खातेदार बॅंकेच्या समोर गर्दी करत आहेत. या प्रकरणात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने स्वत: दखल घेत याची योग्य माहिती देऊन नागरिकांना चिंतामुक्त केले आहे. हे देखील वाचा- आजपासून घरगुती सिलेंडर 100 रुपयांनी झाले स्वस्त, बँकेच्या व्यवहार शुल्कातही झाले बदल

अशाप्रकरच्या अनेक खोट्या माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवल्या जातात. तसेच यापैंकी काही नागरिक खोट्या अफवांवर विश्वास ठेवू लागतात. अशा खोट्या अफवांचा प्रसार करणाऱ्या अनेक लोकांवर गुन्हा दाखल केले गेले आहेत.