LPG Cylinder Price Rate: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलासा; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात, नवीन किमती जाहीर
LPG Cylinder (PC - Latestly File Image)

LPG Cylinder Price Rate: तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) च्या किमतीत सुधारणा केली आहे. देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आजपासून सिलेंडरचे नवीन दर लागू होत आहेत. निवडणुकीच्या वातावरणात पुन्हा एकदा सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 19 रुपयांनी कपात केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे.

ही कपात फक्त व्यावसायिक सिलिंडरवर झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. याचा अर्थ आज तुम्ही सिलिंडर ऑर्डर केल्यास तुम्हाला नवीन दराने सिलिंडर मिळेल. (वाचा - Bank Holidays in May 2024: मे महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका; पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी)

व्यावसायिक सिलेंडरचे नवीनतम दर

  • राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1764.50 रुपये होती. आजपासून त्यांची किंमत 1745.50 रुपये झाली आहे.
  • कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,879 रुपयांवरून 1,859 रुपयांवर घसरली आहे.
  • मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1717.50 रुपये होती. आजपासून त्यांची किंमत 1698 रुपये आहे.
  • चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1,911.00 रुपये आहे.

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

यावेळीही घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडर फक्त 803 रुपयांना मिळणार आहे. 1 फेब्रुवारीच्या महिला दिनानिमित्त घरगुती सिलिंडरच्या दरात 14 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

तथापी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याला घरगुती सिलिंडर 603 रुपयांना मिळत आहे. पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडरवर सबसिडीचा लाभ मिळतो. ही योजना 2016 मध्ये सुरू झाली. या योजनेचा कालावधी मार्च 2024 मध्ये संपणार होता. परंतु मंत्रिमंडळाने आता 31 मार्च 2025 पर्यंत त्याचा कालावधी वाढवला आहे.