IDBI Recruitment 2021: IDBI बँकेत 650 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पहा कसा करता येईल अर्ज?
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने 650 ग्रेड A सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदांसाठी (Post) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पदवीधर उमेदवार अधिकृत वेबसाइट idbibank.in ला भेट देऊन ग्रेड ए सहाय्यक व्यवस्थापकाच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने 650 ग्रेड A सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदांसाठी (Post) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पदवीधर उमेदवार अधिकृत वेबसाइट idbibank.in ला भेट देऊन ग्रेड ए सहाय्यक व्यवस्थापकाच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज (Apply online) करू शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदांसाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. रिक्त पदांचा तपशील या भरती मोहिमेद्वारे ग्रेड ए सहाय्यक व्यवस्थापकाच्या 650 रिक्त पदांची भरती केली जाईल. यापैकी अनारक्षित श्रेणीसाठी 265 पदे आहेत. दुसरीकडे, ओबीसीसाठी 175, ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 65, एससीसाठी 97 आणि एसटी श्रेणीसाठी 48 पदे आरक्षित आहेत.
याची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट 2021 पासुन सुरू झाली आहे. तर याची अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे. यासाठी अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट आहे. सध्या आयडीबीआय बँकेने या भरती परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरती परीक्षेची तारीख जाहीर केली जाऊ शकते.
(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2021 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

