देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असून लसीकरणाचा वेगही वाढत आहे. लसीकरणावरील नॅशनल टेक्नि संख्या कमी होत असताना कोविशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधीकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) ने देशातील कोरोना रुग्णांची आणि लसीकरणाचील अंतर कमी करण्याची शिफारस केली आहे. म्हणजेचं ज्यांनी कोविशील्डची पहिली लस घेतली आहे, त्यांना यापुढे दुसऱ्या डोससाठी 4 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही.
भारताच्या लसीकरणावरील सर्वोच्च संस्था, NTAGI ने पहिल्या डोसनंतर 8 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान अँटी-कोविड-19 लस, Covishield चा दुसरा डोस देण्याची शिफारस केली आहे. (हेही वाचा - WHO on Coronavirus: कोरोना व्हायरसबाबत WHO चा मोठा इशारा! 'या' देशांमध्ये झपाट्याने वाढू शकतात रुग्ण)
दरम्यान, सध्या राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण धोरणाचा भाग म्हणून कोविशील्डचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 12-16 आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) अद्याप भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन डोसच्या कालावधीत कोणताही बदल सुचवलेला नाही. कोवॅक्सिनचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दिला जातो.
NTAGI recommends reducing gap between two doses of Covishield: Sources
Read @ANI Story | https://t.co/Hd3kuCZjQX#COVID19 #Covishield pic.twitter.com/4SBsXf4az0
— ANI Digital (@ani_digital) March 20, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे अनेक देशांमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमध्ये उर्वरित सहा ते सात कोटी लोकांना कोविडशील्डचा दुसरा डोस मिळेल. NTAGI च्या शिफारशींच्या आधारे सरकारने 13 मे 2021 रोजी Covishield च्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर 6-8 आठवड्यांवरून 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवले.